Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे वृत्त जोरकसपणे फेटाळले आहे. एकनाथ शिंदे स्वतः मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. त्यामुळे शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. दरम्यान, आम्ही आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना सांगणार नाही तर कुणाला सांगणार? असा उलट सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.