Cabinet Approval : राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय; अंबादेवी संस्थानाला चिखलदऱ्यात मोठी जमीन मंजूर; चिखलदऱ्यात धार्मिक विकासाला चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाशी संबंधित या एकमेव निर्णयानुसार, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची, एमटीडीसीची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन आणि देवस्थान विकासाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.