Vijay Ghadge : अजित दादांचा घाडगेंना शब्द: माणिकराव कोकाटेंवर मंगळवारपर्यंत कारवाई होणार
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कवाडे बंद केली आहेत. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला हा शब्द दिल्याचा दावा विजय घाडगे यांना केला आहे. सोबतच विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे घाडगे म्हणाले.