Goa Nightclub : गोवा अग्निकांड- जेवण करायला बाहेर पडले आणि लूथरा बंधूंना पकडले; थायलंडमध्ये हद्दपारीची प्रक्रिया सुरू
गोवा येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमधील आग प्रकरणात मुख्य आरोपी सौरभ लूथरा आणि गौरव लूथरा यांना सोमवारपर्यंत भारतात आणले जाऊ शकते. थायलंड पोलिसांनी ११ डिसेंबर रोजी फुकेटमध्ये दोन्ही भावांना ताब्यात घेतले होते. त्यांची हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे.