Pakistan Building : पाकिस्तानात पावसामुळे इमारत कोसळली, 17 मृत्यू; 100 हून अधिक लोक राहत होते, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले
पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी रात्री पाच मजली इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. ही इमारत ली मार्केटमधील फिदा हुसेन शेखा रोडवर होती. अधिकाऱ्यांनी आधीच ही इमारत कमकुवत आणि राहण्यास अयोग्य घोषित केली होती, परंतु अलिकडच्या पावसामुळे तिची स्थिती आणखी बिकट झाली आहे.