Budget 2025 : बजेट 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार, फोन, LED स्वस्त; क्रिटिकल मिनरल्सवरही दिली सूट
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने 36 जीवरक्षक औषधांवरून कस्टम ड्यूटी हटवली आहे. याशिवाय लिथियम-आयन बॅटरी स्क्रॅपवरील शुल्क हटवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यामुळे जीवरक्षक औषधे आणि बॅटरी स्वस्त होतील. त्याच वेळी, सरकारने इंटरएक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील शुल्क 10% वरून 20% पर्यंत वाढवले आहे, ज्यामुळे ते महाग होईल.