Myanmar : म्यानमारमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा मृत्यू; 30 जण जखमी
गुरुवारी रात्री उशिरा म्यानमारच्या सागाईंग प्रदेशातील एका बौद्ध मठावर झालेल्या हवाई हल्ल्यात २३ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला लिन ता लू गावातील मठावर झाला, जिथे जवळच्या गावांमधून १५० हून अधिक लोक आश्रय घेण्यासाठी आले होते.