गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!
गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!, असेच चित्र ठाकरे बंधूंच्या आजच्या तिसऱ्या भेटीवरून दिसून आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनाला गेले. त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे अर्थातच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही होते. दोन्ही बंधूंनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांनी बसविलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. पण प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांच्या चित्रासमोर फोटोला पोज देताना दोन्ही बंधूंनी आपापली हातांची घडी घातलेली दिसली.