British Prime Minister Starmer : ‘संपूर्ण ब्रिटन तुमच्यासोबत आहे…’ ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर यांनी झेलेन्स्कींची घेतली गळाभेट, 2.26 अब्ज पौंडांचे कर्जही दिले
युक्रेन आणि ब्रिटनने शनिवारी २.२६ अब्ज पौंड (२,४८,६३,८६,४६,००० रुपये) किमतीच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे युक्रेनची संरक्षण क्षमता बळकट होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या जोरदार चर्चेच्या एक दिवसानंतर हा करार झाला. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेत, ब्रिटिश पंतप्रधानांनी त्यांना सांगितले की ‘युक्रेनला युनायटेड किंग्डमचा पूर्ण पाठिंबा आहे.’