CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत नाराजी; हाणामारीच्या घटनेने एकाची नव्हे इथल्या प्रत्येकाची प्रतिमा मलिन!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.