Ashok Chavan : विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा ट्रम्पवर अधिक विश्वास!; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल
ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला विनंती केल्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष थांबला, ही वस्तुस्थिती भारतीय सैन्याने स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे दिसते. राजकीय विरोधामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास ठेवावा, अशा बोचऱ्या शब्दांत खा. अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.