Mumbai-Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची 25-30 वाहनांना धडक, 30 ते 35 प्रवासी जखमी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.