BLO Suicide : मतदार यादी पुनरीक्षण; केरळ आणि राजस्थानमध्ये BLOची आत्महत्या, कुटुंबांनी सांगितले- कामाचा दबाव होता
केरळ आणि राजस्थानमधील दोन बीएलओंनी SIR शी संबंधित कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. केरळमधील कन्नूर येथील सरकारी शाळेतील कर्मचारी अनिश जॉर्ज (४४) यांनी रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. ते निवडणुकीसाठी बीएलओ होते. एसआयआरशी संबंधित कामाच्या ताणामुळे अनिशने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.