Bombay High Court : मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांना हटवले, एक लाच घेतल्याबद्दल दोषी आढळले, तर दुसरे जप्त केलेल्या ड्रग्जचा वापर करत होते
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कनिष्ठ न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना भ्रष्ट आचरण व न्यायालयीन अधिकाऱ्यांना अनुरूप वर्तन न केल्याबद्दल बडतर्फ केले. शिस्तपालन समितीच्या चौकशीनंतर सातारा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग इरफान शेख यांची बडतर्फी करण्यात आली.