Bomb blasts : इस्रायलमध्ये 3 बसेसमध्ये बॉम्बस्फोट; दहशतवादी हल्ल्याचा संशय, पार्किंगमध्ये बसेस रिकाम्या उभ्या होत्या
इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये गुरुवारी रात्री उशिरा ३ बसेसमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या बसेस बाट याम आणि होलोन भागातील पार्किंगमध्ये रिकाम्या उभ्या होत्या. या स्फोटांमध्ये कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय व्यक्त केला आहे. इतर दोन बसमध्येही बॉम्ब सापडले आहेत.