Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!
छत्तीसगडमधील बोकारो जिल्ह्यातील लालपानिया येथील लुगु हिल येथे सुरक्षा दल आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एकूण आठ नक्षलवादी ठार झाले. यामध्ये १ कोटींचा इनाम असलेला प्रयाग मांझी उर्फ विवेक, २५ लाखांचा इनाम असलेला अरविंद यादव आणि १० लाखांचा इनाम असलेला साहेब राम मांझी यांचा समावेश आहे.