Raj Thackeray : महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार भरले; निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालंय; मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ‘ग्रँड मेळाव्या’साठी उपस्थित होते.