Laxman Hake : मूळ ओबीसींना तिकीट न दिल्यास ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार; लक्ष्मण हाके यांचा पक्षांना इशारा; बोगस कुणबींना विरोध
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना तिकीट न दिल्यास संबंधित पक्षांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे उपस्थित होते.