State Government : राज्य सरकारने तयार केला गोल्डन डेटा; बोगस लाभार्थींच्या समस्येवर लागणार अंकुश
राज्य सरकारने सरकारी योजनांतील बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एक गोल्डन डेटा तयार केला आहे. या डेटामध्ये राज्यातील सर्वच नागरिकांची इत्यंभूत माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सरकारला भविष्यातील कोणत्याही योजनेसाठी वेगळा सर्व्हे करण्याची काहीच गरज उरणार नाही.