Bangladesh : बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध करणारा पाक समर्थक इस्लामिक पक्ष सत्तेत येण्याची शक्यता, सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर
बांगलादेशमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत एक मोठा राजकीय बदल पाहायला मिळू शकतो. दीर्घकाळ राजकारणाबाहेर राहिलेला पाकिस्तान समर्थक कट्टरपंथी पक्ष जमात-ए-इस्लामी पहिल्यांदाच सरकार स्थापनेच्या अगदी जवळ पोहोचताना दिसत आहे.