Supreme Court : महिलेची पोटगी म्हणून 12 कोटी अन् BMW कारची मागणी; सुप्रीम कोर्टाने म्हटले- तुम्हीही सुशिक्षित, स्वतः कमवा आणि खा
सुप्रीम कोर्टाने घटस्फोटाच्या एका प्रकरणात म्हटले आहे की, जर महिला सुशिक्षित असेल तर तिने पोटगी मागण्याऐवजी स्वतः काम करावे. महिलेने मुंबईत फ्लॅट, १२ कोटी रुपयांचा देखभाल खर्च आणि महागडी बीएमडब्ल्यू कारची मागणी केली होती.