Mithi River : मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई; मुंबईतील 8 जागांवर छापेमारी
मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबईतील सुमारे आठ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. मिठी नदीतून काढलेल्या गाळाचे डंपिंग आणि विल्हेवाट लावण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला बनावट सामंजस्य करार सादर केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदारांशी संबंधित असलेल्या जागांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.