• Download App
    BMC Elections | The Focus India

    BMC Elections

    BMC Elections : काँग्रेसची BMC साठी 87 उमेदवारांची यादी जाहीर; जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न

    काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे.

    Read more

    BMC Elections : मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले, काँग्रेसच्या स्थापनादिनी युतीची घोषणा

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Mumbai BMC Elections : द फोकस एक्सप्लेनर : मुंबईचा ‘किंग’ कोण? महायुतीचा विजयी धडाका विरुद्ध ठाकरेंची अस्तित्वाची लढाई! कुठे कुणाचे पारडे जड? वाचा सविस्तर

    मुंबई महानगरपालिका ही केवळ एक महापालिका नसून आशियातील सर्वात श्रीमंत सत्ताकेंद्र आहे. आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी ठरणार आहे. यावेळच्या रणधुमाळीचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत:

    Read more

    Ashish Shelar :शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच; ठाकरे बंधूंच्या युतीवर आशिष शेलारांची टीका

    महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Read more

    Mumbai Municipal Corporation, : मुंबई मनपात शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत; अमित साटम यांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला, उर्वरित 77 जागांचा लवकरच निर्णय

    मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Navnath Ban : नवनाथ बन म्हणाले- मोदींनी कधीही बाळासाहेबांवर टीका केली नाही; राऊतांची चिखलफेक जनता ओळखून; 96 लाख बोगस मतदारांचा एकही पुरावा नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोदींनी कधीही टीका केली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर संजय राऊत हे चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

    Read more

    BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…

    महायुतीचा उल्लेख करत ‘हा’ दावा केला आहे BMC elections विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणुकीत महायुती जिंकली तर मुंबईकरांना त्यांच्या स्वप्नांची मुंबई […]

    Read more

    मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम, महापौरपदासाठी काँग्रेसकडून रितेश देशमुखच्या नावाची चर्चा!

    BMC Elections :  बृहन्मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी मात्र एकला चलो रे ची […]

    Read more

    माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश, महापालिका निवडणुकाचे चित्र बदलणार !

    Kripashankar Singh Joining BJP : राज्यात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला आहे. आता मुंबईतील उत्तर भारतीय मतदार ज्यांच्या […]

    Read more