• Download App
    BMC Election 2025 | The Focus India

    BMC Election 2025

    BMC Polls Seat : युतीचा मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटला; भाजप 137, शिवसेना 90 जागांवर लढणार; अमित साटम यांची घोषणा

    गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. मुंबईत भाजपने आपल्याकडे अधिक जागा घेतल्या आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे.

    Read more

    BMC Elections : मुंबई महापालिकेत काँग्रेस अन् ‘वंचित बहुजन’चे ठरले, काँग्रेसच्या स्थापनादिनी युतीची घोषणा

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर आता मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

    Read more