Aaditya Thackeray : मातोश्री ड्रोन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; म्हणाले- बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?
बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मातोश्रीच्या परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत महायुती सरकारवर टीका केली आहे. कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.