Ashish Shelar :शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच; ठाकरे बंधूंच्या युतीवर आशिष शेलारांची टीका
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख ‘दोन शून्यांची बेरीज’ असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.