Mumbai BMC Elections : मुंबईत पहिल्यांदा भाजपची सत्ता; मुंबईत उद्धव-राज एकत्र आले तरीही 28 वर्षांनंतर ठाकरेंनी सत्ता गमावली
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत इतिहास घडला. पहिल्यांदाच भाजपला प्रचंड यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीतील शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत भाजप २९ पैकी २५ महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करत आहे.