BJP Sees : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, अजित पवार गटालाही धक्का
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला सुरूच असून, माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसलाही आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.