Operation Sindoor वरून लोकसभेत मार खाल्ला; म्हणून पुन्हा लावून धरला यादीबाह्य मतदारांचा SIR चा मुद्दा!!
केंद्रातल्या मोदी सरकार खऱ्या अर्थाने घेरण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने अडचणीत आणण्यासाठी किंवा पेचात पकडण्यासाठी विरोधकांकडे कुठला मुद्दाच नसल्याने ऑपरेशन सिंदूरवर तरी सरकारला ठोकून काढू या हेतूने त्या विषयावर चर्चा घेण्यात विरोधक यशस्वी झाले पण ऑपरेशन सिंदूरवरच्या मुद्द्यावर चर्चा करताना विरोधकांनी सरकारवर कुठलेही नवे आरोप केले नाहीत जे आरोप केले, ते जुनेच केले, फक्त जरा नवीन भाषेत केले.