Prakash Ambedkar : वंचितची युतीसाठी तयारी, पण काँग्रेसचा प्रतिसाद नाही; प्रकाश आंबेडकरांचा सवाल- भाजपच्या दबावामुळे काँग्रेस सोबत येत नाही का?
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आपली तयारी असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, काँग्रेस आणि इतर कोणत्याही पक्षाने अद्याप युतीसाठी संपर्क साधलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.