BJP President : भाजप प्रदेशाध्यक्षांचा अजित पवारांना थेट इशारा; तुम्ही नरेंद्र मोदी अन् देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षावर आरोप करत आहात हे लक्षात ठेवा!
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेत. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना थेट अजित पवारांनाच निर्वाणीचा इशारा दिला. अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाविषयी बोलत आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणालेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी अजित पवारांना मनभेद किंवा मतभेद निर्माण होतील असे विधान टाळण्याचा सल्ला दिला आहे.