Amit Shah : अमित शहा म्हणाले- महाराष्ट्रात डबल नव्हे ट्रिपल इंजिन सरकार हवे, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत विरोधकांचा सफाया करा
महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असल्यामुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही. मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पूर्ण ताकदीने निवडून विरोधकांचा सफाया करावा. ते दुर्बिणीनेही दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.