BJP Modi : भाजपमध्ये मोठ्या बदलाची तयारी? मोदींच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा
दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ज्यामध्ये अनेक वरिष्ठ भाजप नेते सहभागी झाले होते, त्यामुळे भाजपला नवा अध्यक्ष मिळण्याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्यांनी संघटनात्मक बदल आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेतली.