फडणवीस सरकारमध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!
फडणवीस सरकार मध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!, असला प्रकार फडणवीस सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समोर आणला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विधवा महिलांना देण्यात अडथळा आणणाऱ्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली होती. पण त्या कार्यक्रमाचा अर्धवट व्हिडिओ अजित पवारांच्या नेत्याने आमदार रोहित पवारांना दिला, असा धक्कादायक खुलासा मेघना बोर्डीकर यांनी केला. बोर्डीकरांनी पवार संस्कारितांना expose केले.