BJP Minister Vijay Shah : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप मंत्री विजय शाह यांचे वादग्रस्त वक्तव्य; संतापाची लाट
ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक मोहिमेची जगासमोर माहिती मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या भाषणातील धर्माचा उल्लेख करत केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे देशभरात टीकेची लाट उसळली आहे.