Raosaheb Danve : मी खरा वाघ, ठाकरे बंधू केवळ कागदी, उद्धव ठाकरे शेपटी खाली घालून विधान परिषदेवर गेल्याची रावसाहेब दानवे यांची टीका
भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत.