BJP Checks : भाजपचा ‘घराणेशाही’ला ब्रेक; महापालिकेत आमदार-खासदारांच्या मुलांना तिकीट नाही
नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. “पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा,” या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रकर्षाने दिसून आली.