Vice President Election : द फोकस एक्सप्लेनर : उपराष्ट्रपती निवडणुकीची जोरदार तयारी; उमेदवारांची जोरदार चर्चा, कशी होते निवडणूक?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर केवळ ३ दिवसांतच निवडणूक आयोगाने या पदासाठी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लवकरच निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर होणार आहेत. यावेळी भाजपकडून नव्या उमेदवाराच्या नावावर चर्चा सुरू झाली असून, थावरचंद गहलोत आणि ओम माथूर या दोन नेत्यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.