Bitcoin : अमेरिकेने क्रिप्टोचे धोरणात्मक रिझर्व्ह तयार केले; बिटकॉइनच्या किमती 5 टक्क्यांनी घसरल्या, ट्रम्प क्रिप्टो समिट होस्ट करणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिटकॉइन आणि इतर डिजिटल मालमत्तांचा धोरणात्मक राखीव निधी तयार करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे ब्लॉकचेन मालमत्तेचा राष्ट्रीय संग्रह तयार करणाऱ्या जगातील काही मोजक्या देशांपैकी अमेरिका एक बनला आहे.