Bindiyarani Devi : भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहावे पदक; बिंदियारानीने 199 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले, ज्ञानेश्वरीला रौप्यपदक
भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या 58 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 199 किलो (87 किलो स्नॅच + 112 किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून कांस्यपदक पटकावले. यासोबतच भारताची एकूण 6 पदके झाली आहेत. वेटलिफ्टिंगमधील हे पाचवे पदक आहे.