Kathua Encounter : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार; अमेरिका मेड M4 रायफल जप्त
शुक्रवारी संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे सुरक्षा दलांनी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर उस्मान याला ठार मारले. बिल्लावार परिसरात ही चकमक झाली. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.