Bilawal Bhutto : दहशतवादाला प्रोत्साहनाची बिलावल भुट्टोंची कबुली; म्हणाले- पाकिस्तानचा इतिहास कोणापासून लपलेला नाही
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो यांनी दहशतवादाला पोसल्याची कबुली दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बिलावल यांनी कबूल केले की पाश्चात्य देशांच्या सहकार्याने पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन दिले आहे.