तेजस्वी यादव आणि मुकेश सहानींना काँग्रेसने लावली लॉटरी; पण बिहारी महागठबंधन मध्ये जागा वाटपाचा घोळ कायम!!
बिहारच्या महागठबंधन मध्ये जागा वाटपाचा घोळ कायम ठेवून काँग्रेसने तेजस्वी यादव आणि मुकेश सहानी यांना लॉटरी लावून टाकली. काँग्रेसने अखेर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा तर मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करून टाकले. मात्र, काँग्रेसने स्वतःचा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही.