Bihar : बिहार निवडणुकीच्या 7 महिने आधी मंत्रिमंडळ विस्तार; भाजपचे 7 आमदार झाले मंत्री
ऑक्टोबर 2025 मध्ये बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या ७ महिने आधी बुधवारी नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. ७ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापैकी ४ मिथिला प्रदेशातील आहेत. यांचा समावेश करून, आता मिथिलाचे ६ मंत्री आहेत. बुधवारी मंत्री झालेले सर्व आमदार भाजपचे आहेत. यापैकी ३ मागासवर्गीय, २ अत्यंत मागासवर्गीय आणि २ उच्चवर्णीय समुदायातील आहेत.