Bihar Voting : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होऊ शकतात; दिवाळी-छठनंतर बिहारमध्ये मतदानाची शक्यता
निवडणूक आयोग ऑक्टोबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा करू शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये दोन किंवा तीन टप्प्यात मतदान शक्य आहे. नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये मतदान होईल.