Bihar Nitish Kumar : विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश सरकारचा निर्णय; बिहारमध्ये नोकऱ्यांत फक्त स्थानिक महिलांनाच 35% आरक्षण
बिहार सरकारने सरकारी नोकऱ्यांमधील महिलांसाठीचे ३५% आरक्षण फक्त राज्यातील कायमस्वरूपी रहिवाशांसाठी मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांसाठीचे धोरण लागू करण्याची मागणी वाढत होती.