NEET Exam 2026 : NEET परीक्षेआधी पुन्हा ‘पेपर लीक’चा खेळ! टेलिग्रामवर ‘अस्सल प्रश्नपत्रिका’ विक्रीचा दावा; बिहारमध्ये 5 जण अटकेत
देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET परीक्षेभोवती पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात पेपरफुटीच्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाल्यानंतर आता बिहारमधील मुजफ्फरपूर येथे ‘अस्सल प्रश्नपत्रिका’ देण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. 21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वीच या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे.