Bihar Gang Rape : बिहारमध्ये तरुणीवर रुग्णवाहिकेत गँगरेप; भरतीच्या वेळी धावताना बेशुद्ध पडली, रुग्णालयात नेताना ड्रायव्हर-तंत्रज्ञाचे दुष्कृत्य
बिहारमधील गया येथे होमगार्ड भरतीसाठी आलेल्या एका २६ वर्षीय मुलीवर रुग्णवाहिकेत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शनिवारी चालक आणि तंत्रज्ञांना अटक केली आहे. घटनेनंतर आरोपीने पीडितेला गप्प राहण्याची धमकी दिली होती.