Bihar election : बिहार निवडणुकीच्या रिंगणात ‘आप’ने मारली उडी ; सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवणार
तरैया विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे भावी उमेदवार मनोरंजन सिंह यांनी त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यात सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनीती अंतिम केली जात आहे.