Trump : ट्रम्प यांचे बिग ब्युटीफुल विधेयक चर्चेसाठी पारित; सिनेटमध्ये 51-49 मतांनी प्रस्ताव मंजूर; मस्क यांचा विरोध
अमेरिकन सिनेटने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रिय बिग ब्युटीफुल विधेयकाला चर्चेसाठी मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या मतदानात, सिनेटने ५१-४९ मतांच्या फरकाने प्रक्रियात्मक ठराव मंजूर केला, ज्यामुळे सभागृहाला विधेयकावर चर्चा सुरू करण्याची परवानगी मिळाली.